Ad will apear here
Next
‘पारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचन’ या पुस्तकाचे प्रकाशन
स्वरदा ढेकणे
पुणे : नृत्य क्षेत्रातील विद्वान आणि साहित्यिक डॉ.पप्पु वेणुगोपाल राव लिखित ‘बंच ऑफ जावळीज्’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद नृत्य कलाकार आणि ब्लॉगर स्वरदा ढेकणे हिने केला आहे. या ‘पारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचन’ पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी, २८ जुलै रोजी ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर, शिक्षणतज्ज्ञ अर्चना नेगिनहाल आणि मोहिनीअट्टम् नृत्यांगना डॉ. रेखा राजु यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान स्वतः डॉ. पप्पु वेणुगोपाल राव भूषविणार आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह येथे सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

जावळी म्हणजे दक्षिण भारतात उगम पावलेल्या शास्त्रीय संगीत आणि नृत्यातील नायक-नायिकांवर आधारित पारंपरिक रचनाप्रकारांपैकी एक.१९ व्या शतकात दक्षिणेकडील अनेक राजांनी व कवींनी असंख्य जावळी रचना लिहिल्या. विविध रचनाकारांनी रचलेल्या काही वैविध्यपूर्ण जावळींचा अर्थ, विवेचन आणि पार्श्वभूमी मराठी भाषेत जाणून घेता याव्यात यासाठी स्वरदा ढेकणे हिने हा अनुवाद केला आहे. 

या कार्यक्रमात स्वरदा ढेकणे ‘समर्पण’ या भरतनाट्यम् नृत्याद्वारे जावळींचे सादरीकरण करणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रार्थना सदावर्ते आणि श्रावणी सेन करणार आहेत. 

कार्यक्रमाविषयी 
‘पारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचन’ पुस्तक प्रकाशन 
वेळ : शनिवार, २८ जुलै, सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रस्ता 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZPIBQ
Similar Posts
स्वरदा ढेकणे अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन पुणे : विविध रचनाकारांनी रचलेल्या काही वैविध्यपूर्ण जावळींचा अर्थ, विवेचन आणि पार्श्वभूमी मराठी भाषेतून समजून घेण्यासाठी नृत्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध विद्वान आणि साहित्यिक डॉ. पप्पू वेणुगोपाल राव लिखित ‘बंच ऑफ जावळीज्’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आणि संकलन असलेले ‘पारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचन’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले
वैद्य खडीवाले यांच्या पुस्तकांचे शनिवारी प्रकाशन पुणे : वैद्य प. य. वैद्य खडीवाले लिखित आणि डायमंड पब्लिकेशन प्रकाशित ‘आयुर्वेदीय वनौषधी’ (सचित्र वनस्पतींची उपयुक्तता), ‘सहजसोपे घरगुती आयुर्वेदीय उपचार’ आणि ‘एटूझेड आरोग्यवर्धिनी’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन व वैद्य खडीवाले यांचे सर्वांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी , ९
‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांनी उलगडून दाखवलेली ‘सुरतेची स्वारी’, स्वारी दरम्यान शिवाजी महाराजांनी घेतलेल्या सर्वधर्मीय काळजीचे प्रसंग, आई वडलांची काळजी घेत चला, वाचन करा, शिक्षणाशिवाय सारेच व्यर्थ आहे, असा बाबासाहेबांनी दिलेला संदेश आणि महाराष्ट्र गुजरात यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध राहावेत, असे केलेलं
‘वडिलधाऱ्यांचा आदर हीच भारतीय संस्कृतीची शिकवण’ पुणे : ‘वडिलधाऱ्यांचा आदर करणे ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मात्र, आज दुर्दैवाने अनेकदा तरुणपिढीत त्याचा अभाव दिसतो. छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे जीवनाचा आनंद घेता येत नाही. सकारात्मक विचार आणून, त्रासून न जाता आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर आपल्यासह इतरांचेही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language